A New Comer Asks

This leaflet is intended for people approaching Alcoholics Anonymous (A.A.) for the first time. In it we have tried to answer the questions most frequently in the minds of newcomers — the questions which were in our minds when we first approached the Fellowship.

Am I an alcoholic?

If you repeatedly drink more than you intend or want to, if you get into trouble, or if you have memory lapses when you drink, you may be an alcoholic.


Only you can decide. No one in A.A. will tell you whether you are or are not.

What can I do if I am worried about my drinking?

Seek help. Alcoholics Anonymous can help.

What is Alcoholics Anonymous?

We are a Fellowship of people who have lost the ability to control our drinking and have found ourselves in various kinds of trouble as a result of drinking. We attempt -- most of us successfully -- to create a satisfying way of life without alcohol. For this we find we need the help and support of other alcoholics in A.A.

If I go to an A.A. meeting, does that commit me to anything?

No. A.A. does not keep membership files or attendance records. You do not have to reveal anything about yourself. No one will bother you if you don’t want to come back.

What happens if I meet people I know?

They will be there for the same reason you are there. They will not disclose your identity to outsiders. At A.A. you retain as much anonymity as you wish. That is one of the reasons we call ourselves Alcoholics Anonymous.

What happens at an A.A. meeting?

An A.A. meeting may take one of several forms, but at any meeting you will find alcoholics talking about what drinking did to their lives and personalities, what actions they took to help themselves, and how they are living their lives today.

How can this help me with my drinking problem?

We in A.A. know what it is like to be addicted to alcohol, and to be unable to keep promises made to others and ourselves that we will stop drinking. We are not professional therapists. Our only qualification for helping others to recover from alcoholism is that we have stopped drinking ourselves; and problem drinkers coming to us know that recovery is possible because they see people who have done it.

Why do A.A.s keep on going to meetings after they are cured?

We in A.A. believe there is no such thing as a cure for alcoholism. We can never return to normal drinking, and our ability to stay away from alcohol depends on maintaining our physical, mental, and spiritual health. This we can achieve by going to meetings regularly and putting into practice what we learn there. In addition, we find it helps us to stay sober if we help other alcoholics.

How do I join A.A.?

You are an A.A. member if and when you say so. The only requirement for A.A. membership is a desire to stop drinking, and many of us were not very wholehearted about that when we first approached A.A.

How much does A.A. membership cost?

There are no dues or fees for A.A. membership. An A.A. group will usually have a collection during the meeting to cover expenses, such as rent, coffee, etc., and to this all members are free to contribute as much or as little as they wish.

Is A.A. a religious organization?

No. Notr is it allied with any religious organization.

There’s a lot of talk about God, though, isn’t there?

The majority of A.A. members believe that we have found the solution to our drinking problem not through individual willpower, but through a power greater than ourselves. However, everyone defines this power as he or she wishes. Many people call it God, others think it is the A.A. group, still others don’t believe in it at all. There is room in A.A. for people of all shades of belief and nonbelief.

Can I bring my family to an A.A. meeting?

Family members or close friends are welcome at “open” A.A. meetings. Discuss this with your local contact.

What advice do you give new members?

In our experience, the people who recover in A.A. are those who :

  • Stay away from the first drink;
  • Attend A.A. meetings regularly;
  • Seek out the people in A.A. who have successfully stayed sober for some time;
  • Try to put into practice the A.A. program of recovery;
  • Obtain and study the Big Book, Alcoholics Anonymous.

How can I contact A.A.?

Look for Alcoholics Anonymous online or in your local telephone directory. These telephones are answered by A.A. volunteers who will be happy to answer your questions, or put you in touch with those who can. If there is no A.A. telephone service close to you, write or phone the A.A. General Service Office or visit our website at www.aagsoindia.org, or www.aa.org.

Here is a list of A.A. pamphlets which may be particularly helpful to you :

  • Is There an Alcoholic in Your Life?
  • Frequently Asked Questions About A.A.
  • Is A.A. for You?
  • Do You Think You’re Different?
  • Women in A.A.
  • Young People in A.A.

Remember that alcoholism is a progressive disease. Take it seriously, even if you feel you are only in the early stages of the illness. Alcoholism kills people. If you are an alcoholic, and if you continue to drink, in time you will get worse.

नवागताचे प्रश्न

प्रथमच अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (ए. ए.) शी संपर्क साधणाऱ्या लोकांसाठी हे माहितीपत्रक आहे. यामध्ये नवागतांच्या मनात वारंवार निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे -- असे प्रश्न जे आमच्या मनात होते जेव्हा आम्ही पहिल्यांदा फेलोशिपच्या संपर्कात आलो होतो.

मी मद्यासक्त आहे का?

जर तुम्ही पुनःपुन्हा, ठरविलेले आहे त्यापेक्षा जास्त किंवा इच्छेपेक्षा अधिक मद्यपान करीत असाल, जर मद्यपानामुळे अडचणीत येत असाल, किंवा मद्यपान केल्यानंतर तुमची स्मरणशक्ती कमी झाली असेल तर तुम्ही मद्यासक्त असू शकता.

हा निर्णय केवळ तुम्हीच घेऊ शकता. तुम्ही मद्यासक्त आहात की नाही हे ए. ए. मधील कोणीही तुम्हाला सांगणार नाही.

मला माझ्या मद्यपानाबद्दल काळजी वाटते आहे तर मी काय करु शकतो?

मदत घ्या. अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस मदत करु शकते.

अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस म्हणजे काय?

अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस म्हणजे ज्यांनी आपल्या मद्यपानावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता गमावलेली आहे, आणि जे स्वतः मद्यपानामुळे विविध प्रकारच्या संकटात सापडलेले आहेत अशा लोकांची भ्रातृभाव संघटना आहे. आम्ही मद्याशिवाय समाधानाने जीवन जगण्याचा मार्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, आणि आमच्यापैकी बहुतांश जण त्यामध्ये यशस्वी होतात. आम्हाला असे आढळले की, ह्यासाठी आम्हाला ए. ए. मधील इतर मद्यासक्त व्यक्तींच्या मदतीची आणि आधाराची आवश्यकता आहे.

जर मी ए. ए. च्या सभेला उपस्थित राहिलो तर त्यामुळे मी काही गोष्टी करण्यासाठी बांधील होतो का?

याचे उत्तर नाही असे आहे. ए. ए. ही सदस्यत्वाची माहिती किंवा सदस्यांच्या उपस्थितीच्या नोंदी ठेवीत नाही. तुम्हाला तुमच्याबद्दलची कोणतीही माहिती सांगण्याची आवश्यकता नाही. जर तुम्हाला परत यावयाचे नसेल तर तुम्ही पुन्हा यावे म्हणून कोणीही तुम्हाला त्रस्त करणार नाही.

माझी भेट माझ्या ओळखीच्या लोकांशी झाली तर काय होईल?

ते सुद्धा त्याच कारणांसाठी तिथे आले असतील, ज्या कारणासाठी तुम्ही तिथे आला आहात. ते तुमची ओळख बाहेरील लोकांसमोर उघड करणार नाहीत. ए. ए. मध्ये तुम्ही तुम्हाला हवी तितकी अनामिकता पाळू शकता. आम्ही स्वतःला अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस म्हणतो त्यामागचे हे एक कारण आहे.

ए. ए. च्या सभेमध्ये काय चालते?

ए. ए. ची सभा तिच्या अनेक स्वरुपांपैकी एका स्वरुपात असू शकते, परंतु कोणत्याही सभेमध्ये तुम्हाला मद्यासक्त व्यक्ती ह्या मद्यपानाने त्यांच्या जीवनावर आणि व्यक्तीमत्त्वावर काय परिणाम केला, स्वतःला मदत करण्यासाठी त्यांनी कोणती पावले उचलली, आणि आज ते त्यांचे जीवन कसे जगत आहेत याबद्दल बोलत असल्याचे आढळतील.

ह्या सभांमुळे मला माझी मद्यपानाची समस्या सोडविण्यास कशी मदत होईल?

मद्याची आसक्ती असणे म्हणजे काय असते, आणि आपण मद्यपान थांबवू अशी इतरांना आणि स्वतःला दिलेली आश्वासने पाळण्यात असमर्थ असणे म्हणजे काय असते ते ए. ए. मधील आम्हाला माहिती आहे. आम्ही व्यावसायिक रोगनिवारण तज्ञ नाही आहोत. मद्यपाशातून इतरांना बरे होण्यास मदत करण्यासाठीची आमची एकमेव पात्रता म्हणजे आम्ही स्वतः मद्यपान करणे बंद केले आहे; आणि आमच्याकडे येणाऱ्या समस्याग्रस्त मद्यपान करणाऱ्यांना माहीत आहे की ह्यातून बरे होणे शक्य आहे कारण ज्यांनी असे केले आहे त्यांना ते पाहतात.

ए. ए. चे सदस्य बरे झाल्यानंतरही (मद्यपान थांबल्यानंतर देखील) ते सभांना का जात राहतात?

आम्हा ए. ए. सदस्यांची खात्री आहे की, मद्यपाश आजारावर असा (कायमस्वरुपी) कोणताही इलाज नाही. आम्ही यापुढे कधीही सामान्यपणे मद्यपान करु शकणार नाही, आणि मद्यापासून दूर राहण्याची आमची क्षमता ही आमच्या शारीरिक, मानसिक, आणि आध्यात्मिक निरोगीपणा टिकवण्यावर अवलंबून आहे. नियमितपणे सभांना उपस्थित राहून आणि तिथे जे शिकतो ते आचरणात आणून आम्ही हे साध्य करु शकतो. याखेरीज, आम्हाला असेही दिसून आले आहे की, जर आम्ही इतर मद्यासक्त व्यक्तींना मद्यमुक्त राहण्यासाठी मदत केली, तर त्यामुळे आम्हाला मद्यमुक्त राहण्यास मदत होते.

मी ए. ए. मध्ये कसा सामील होऊ शकतो?

जर तुम्ही स्वतःला मी ए. ए. चा सदस्य आहे असे जेव्हा म्हणता तेव्हा तुम्ही ए. ए. चे सदस्य झालेले असता. ए. ए. चे सदस्य होण्यासाठी मद्यपान थांबविण्याची इच्छा असणे ही एकमात्र आवश्यकता आहे, आणि जेव्हा आम्ही पहिल्यांदा ए. ए. शी संपर्क साधला होता तेव्हा आमच्यापैकी अनेक जण त्याबद्दल फारसे मनापासून तयार नव्हते.

ए. ए. चा सदस्य होण्यासाठीचा खर्च किती आहे?

ए. ए. चा सदस्य होण्यासाठी कोणतीही देय रक्कम अथवा शुल्क नाही. ए. ए. चा समूह हा सभेच्या जागेचे भाडे, चहापान, इत्यादी खर्च भागविण्यासाठी सहसा सभेच्या दरम्यान पैसे गोळा करतो; आणि सर्व सदस्य त्यांच्या इच्छेनुसार कमी किंवा अधिक प्रमाणात योगदान देण्यास स्वतंत्र असतात.

ए. ए. ही धार्मिक संस्था आहे का?

ए. ए. ही धार्मिक संस्था नाही. तसेच ती कोणत्याही धार्मिक संघटनेशी संबंधित नाही.

तरीही तिथे परमेश्वराच्याबद्दल खूप चर्चा होते, होय ना?

बहुसंख्य ए. ए. सभासदांचा असा विश्वास आहे की, आम्ही आमच्या मद्यपानाच्या समस्येवरचा उपाय हा वैयक्तीक इच्छाशक्तीच्याद्वारे नाही, तर आमच्या स्वतःपेक्षा उच्च अशा शक्तीच्याद्वारे शोधलेला आहे. तथापि, प्रत्येकजण, तो किंवा ती, या शक्तीची व्याख्या तिच्या इच्छेनुसार (मर्जीनुसार) करतो. अनेक सभासद तिला परमेश्वर असे म्हणतात, इतरांना ती ए. ए. चा समूह आहे असे वाटते, तर अन्य काही सभासद त्यावर अजिबात विश्वास ठेवत नाहीत. ए. ए. मध्ये सर्व प्रकारच्या श्रध्दा असलेल्या आणि श्रध्दा नसलेल्या लोकांसाठी प्रवेश आहे.

मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना ए. ए. च्या सभेला आणू शकतो का?

मद्यासक्ताच्या कुटुंबातील सदस्यांचे किंवा जवळच्या मित्रांचे "सर्वांसाठी खुल्या" असलेल्या ए. ए. सभेमध्ये स्वागतच केले जाते. तुमच्या स्थानिक संपर्काशी याविषयी सल्लामसलत करा.

तुम्ही नवीन सदस्यांना काय सल्ला देता?

आमच्या अनुभवानुसार, ए. ए. मध्ये येऊन ज्यांच्यामध्ये सुधारणा होते ते असे सदस्य आहेत जे :

  • पहिल्या घोटापासून दूर राहतात;
  • ए. ए. च्या सभांना नियमितपणे उपस्थित राहतात;
  • ए. ए. मधील अशा लोकांचा शोध घेतात जे काही कालावधी यशस्वीरित्या मद्यमुक्त आहेत;
  • ए. ए. चा सुधारणेचा कार्यक्रम आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात;
  • बिग बुक, म्हणजेच अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस हे पुस्तक प्राप्त करतात आणि त्याचा अभ्यास करतात.

मी ए. ए. शी संपर्क कसा साधू शकतो?

अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस समूहाचा ऑनलाईन किंवा तुमच्या स्थानिक टेलिफोन डिरेक्टरीमध्ये शोध घ्या. या दूरध्वनीं कॉलची उत्तरे ए.ए.च्या स्वयंसेवकांद्वारे दिली जातात, ज्यांना तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आनंद होईल, किंवा तुमचा अशा व्यक्तींशी संपर्क करुन देऊ शकतात जे तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील. तुमच्या आसपास ए.ए.ची टेलिफोन सुविधा उपलब्ध नसल्यास, ए.ए. जनरल सर्व्हिस ऑफिसला लिहा किंवा फोन करा किंवा www.aagsoindia.org अथवा www.aa.org वर आमच्या वेबसाइटला भेट द्या.

विशेष करुन तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकतील अश्या ए.ए. पुस्तिकांची यादी इथे दिलेली आहे :

  • तुमच्या जीवनांत कोणी मद्यासक्त आहे का? - (मराठी)
  • फ्रिक्वेंटली आस्क्ड् क्वेशंस् अबाउट ए. ए.? - (इंग्रजी)
  • ए. ए. तुमच्यासाठी आहे का? - (मराठी)
  • डू यू थिंक यू आर डिफरंट? - (इंग्रजी)
  • वुमेन इन ए. ए. - (इंग्रजी)
  • यंग पिपल इन ए. ए. - (इंग्रजी)

लक्षात ठेवा की मद्यपाश हा एक वाढत जाणारा आजार आहे. तुम्ही केवळ आजाराच्या सुरुवातीच्या अवस्थेत आहात असे तुम्हाला वाटत असले तरीही ते गांभीर्याने घ्या. मद्यपाशामुळे लोकांचा मृत्यू होतो. जर तुम्ही मद्यासक्त असाल, आणि तुम्ही मद्यपान करीतच राहिलात तर, कालांतराने तुमची अवस्था आणखीनच वाईट होईल.

Scroll to Top