1. आम्ही मान्य केले की आम्ही मद्यापुढे शक्तीहीन होतो — तसेच आमची आयुष्ये विस्कळीत झालेली होती.
2. आमच्यापेक्षा श्रेष्ठ अशी शक्तीच आमचा विवेक पुर्ववत मिळवून देऊ शकेल असा आम्हाला विश्वास आला.
3. आमच्या इच्छा आणि आमची आयुष्ये आम्हाला समजलेल्या परमेश्वरावर सोपविण्याचा निर्णय घेतला.
4. आमच्या स्वतःचा नैतिकतेने शोधक आणि निर्भय आढावा घेतला.
5. परमेश्वराजवळ, स्वतःपाशी, आणि अन्य मानवी व्यक्तीकडे आमच्या चुकांच्या नेमक्या स्वरुपाची कबुली दिली.
6. परमेश्वराने हे चारित्र्य दोष दूर करावेत याकरिता आम्ही पूर्णपणे तयार झालो.
7. नम्रपणे याचना केली की परमेश्वराने आमच्यातील उणीवा दूर कराव्यात.
8. आम्ही ज्या व्यक्तींना इजा पोहोचवलेली होती अशा सर्वांची यादी केली आणि त्या सर्वांची प्रत्यक्षपणे क्षमा मागावयाला व नुकसानभरपाई करावयाला तयार झालो.
9. शक्य होते तिथे अशा व्यक्तींची प्रत्यक्षपणे क्षमा मागितली आणि नुकसानभरपाई केली, परंतु असे केल्याने त्यांना किंवा इतरांना त्रास होईल अशा व्यक्तींना मात्र वगळले.
10. वैयक्तीक आढावा घेण्याचे काम चालू ठेवले आणि स्वतःची चूक लक्षात येताच त्याची तात्काळ कबुली दिली.
11. प्रार्थना आणि ध्यान यांच्या माध्यमातून आम्हाला समजलेल्या परमेश्वराबरोबरील आमचा जाणीवपूर्ण संबंध वाढविण्याचा प्रयत्न केला, (आणि) आमच्या संबंधात 'त्याची' इच्छा काय आहे हे जाणून घेण्यासाठीच आणि ती इच्छा अंमलात आणण्याची शक्ती मिळावी यासाठीच प्रार्थना करु लागलो.
12. ह्या पायऱ्यांच्या आचरणाचा परिणाम म्हणून आमच्यामध्ये आध्यात्मिक जागृती झाली आणि हा संदेश आम्ही इतर मद्यासक्तांना देण्याचा तसेच आमच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात या तत्त्वांचे पालन करण्याचा प्रयत्न केला.