1. आपल्या सामायिक हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे; व्यक्तीगत सुधारणा ही ए.ए.च्या ऐक्यावर अवलंबून आहे.
2. प्रेमळ परमेश्वर हाच आमच्या समूहाच्या उद्देशासाठी एकमेव सर्वोच्च अधिकारी आहे. तो परमेश्वर त्याची स्वतःची इच्छा समूहाच्या सदसद्-विवेक बुद्धीद्वारे व्यक्त करतो. आमचे नेते हे विश्वासू सेवक असतात; ते अधिकार गाजवीत नाहीत.
3. 'मद्यपान थांबविण्याची इच्छा' हीच ए.ए.चे सदस्यत्व मिळविण्यासाठी लागणारी एकमेव आवश्यकता आहे.
4. प्रत्येक समूह स्वायत्त असायला हवा परंतु ह्यामुळे इतर समूहांच्या किंवा अखंड ए.ए.च्या कार्यावर मात्र विपरीत परिणाम होता कामा नये.
5. जो अजूनही दुःख भोगत आहे अशा मद्यासक्तापर्यंत ए.ए.चा संदेश पोहोचविणे हेच प्रत्येक समूहाचे एकमेव प्राथमिक उद्देश आहे.
6. पैसा, मालमत्ता, आणि प्रतिष्ठेच्या समस्यांमुळे आपण आपल्या प्राथमिक उद्देशापासून दूर जाऊ नये म्हणूनच ए.ए. समूहाने कोणत्याही संबंधित कार्याला किंवा बाहेरील उपक्रमाला कधीही मान्यता देऊ नये, पैसा पुरवू नये किंवा त्यांच्याशी ए.ए.चे नाव जोडू नये.
7. ए.ए.चा प्रत्येक समूह संपूर्णपणे स्वावलंबी असायला पाहिजे, बाहेरुन मिळणारी मदत स्वीकारु नये.
8. अल्कोहोलिक्स ॲनॉनिमसने व्यावसायिकपणा नेहेमीच टाळला पाहिजे, परंतु आमची सेवा केंद्रे विशेष सेवक नोकरीला ठेवू शकतात.
9. ए.ए.ला, संघटनेचे स्वरुप कधीही दिले जाऊ नये; मात्र ज्यांची सेवा करतील त्यांनाच प्रत्यक्षात जबाबदार असतील अशी सेवा मंडळे किंवा सेवा समित्या आम्ही निर्माण करु शकतो.
10. अल्कोहोलिक्स ॲनॉनिमसचे बाह्य वादविषयावर काहीही मत नसते; म्हणून सार्वजनिक वादविवादात ए.ए.चे नाव येऊ देऊ नये.
11. आमचे जनसंपर्काचे धोरण हे जाहिरातबाजी नव्हे तर आकर्षित करुन घेण्यावर आधारलेले आहे; आम्हाला वृत्तपत्रे, आकाशवाणी, आणि चलचित्रपटांच्या पातळीवर नेहेमीच व्यक्तीगत निनांवीपणा जपण्याची आवश्यकता आहे.
12. निनांवीपणा हा आमच्या सर्व रुढींचा आध्यात्मिक पाया आहे, जो आम्हाला व्यक्तींच्या आधी तत्वांना अधिक महत्व दिले पाहिजे ह्याचे सतत स्मरण देतो.